स्वरा भास्कर अडचणीत? हिंदू विषयीच्या ट्विट मुळे सोशलवर नवे “तांडव’ सुरु

हे ट्विट केल्यानंतर स्वराला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे

मुंबई – अली अब्बास जफर यांची नवीन वेबसिरीज “तांडव’ चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 15 जानेवारीला या वेबसिरीजचा पहिला एपिसोड अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला. मात्र, पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता जीशान आयुब एका हास्य नाट्यद्वारे काही कॉमेंट करताना दिसतो. त्यावर प्रेक्षकांनी काही आक्षेप घेतले आहेत. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आक्षेप असल्याने आता ‘तांडव’ वेब सिरीज बाबत नेटकऱ्यांनी चांगलाच तांडव घातला आहे.

अनेकांच्या भावना दुखावल्या मुळे सिरीजचा डायरेक्‍टर अली अब्बास जाफरने ट्‌विटरवर माफी मागून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या या माफीनाम्यामुळे कोणताच फरक न पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या वेब सिरीजवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे केली आहे.

दरम्यान, हा सर्व वाद रंगात असताना बॉलिवूड अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ हिने सुद्धा ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरा म्हणाली कि, “मी देखील हिंदू आहे पण, यातील कोणत्याच दृश्यामुळं नाराज झाले नाहीए’, असं स्वरानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे ट्विट केल्यानंतर स्वराला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.