नवरात्री निमित्त स्वप्निल जोशीची आईसाठी पोस्ट, म्हणाला…

मुंबई- अभिनेता स्वप्निल जोशी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात असतो. नवरात्री निमित्त त्याने आपल्या आईचा फोटो शेअर केला आहे. नवरात्रीचं पहिलं वंदन आईला या हेतून हा फोटो शेअर केला आहे.

माझी आई, माझी दुर्गा… आई… जन्मलेल्या प्रत्येकाचं पहिलं शक्तीपीठ! आई, या नावात, या शब्दातंच सगळं आलं. आई म्हणजे, शक्ती.. आई म्हणजे शांती, आई म्हणजे भक्ती, आई म्हणजे युक्ती… आई म्हणजे आनंद. आई म्हणजे समाधान! कुठलीही गोष्ट जी आपल्याला सामावून घेते, आपली पापं पोटात घालते, प्रेमानी कुशीत घेते… ती आई! आई मध्ये एक अचाट शक्ती असते आणि त्यातूनंच कदाचित तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांती येते. जिच्याकडे नुसतं बघितल तरी आपली दुःख, अडचणी विसरुन जायला होतं! माझ्या आईला आणि जगातल्या सगळ्या आईंना मनापासून वंदन, असं कॅप्शन लिहिलं आहे.

दरम्यान, नवरात्रीत घरोघरी देवीची पुजा केली जाते. आजच्या दिवसाचा रंग करडा असल्याने अनेक अभिनेत्रींनी त्यारंगाच्या वेशातील फोटो पोस्ट केले आहेय

 

View this post on Instagram

 

My Mother, My Durga… आई… जन्मलेल्या प्रत्येकाचं पहिलं शक्तीपीठ! आई, या नावात, या शब्दातंच सगळं आलं. आई म्हणजे, शक्ती.. आई म्हणजे शांती, आई म्हणजे भक्ती, आई म्हणजे युक्ती… आई म्हणजे आनंद. आई म्हणजे समाधान! कुठलीही गोष्ट जी आपल्याला सामावून घेते, आपली पापं पोटात घालते, प्रेमानी कुशीत घेते… ती आई! आई मध्ये एक अचाट शक्ती असते आणि त्यातूनंच कदाचित तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांती येते. जिच्याकडे नुसतं बघितल तरी आपली दुःख, अडचणी विसरुन जायला होतं! माझ्या आईला आणि जगातल्या सगळ्या आईंना मनापासून वंदन! #navratri2020 #motherdurga

A post shared by 𝚂𝚠𝚊𝚙𝚗𝚒𝚕 𝙹𝚘𝚜𝚑𝚒 (@swwapnil_joshi) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.