Swapnil Joshi | बॉलिवूड आणि साऊथच्या कलाकरांना महागड्या गाड्यांची आवड असल्याचे पाहायला मिळते. अभिनेता स्वप्नील जोशीला देखील महागड्या गाड्यांची आवड आहे. नुकतेच त्याने एक नवी कार खरेदी केली आहे. इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती त्याने चाहत्यांना दिली आहे. त्याच्या गाडीची पहिली झलकही त्याने याद्वारे दाखवली आहे.
स्वप्नीलनं नवी कोरी रेंज रोव्हर डिफेंडर कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटीच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे. त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट करून नव्या गाडीबद्दल लिहीले की, “डिअर जिंदगी-आजचा दिवस नक्कीच खास आहे आणि तितकाच अभिमानास्पद देखील आहे. बाबांना आमच्या नवीन रेंज रोव्हर डिफेंडरची चावी घेताना बघणं हा एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे.’
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की, ‘डिफेंडर ही एक फक्त एक गाडी नाहीये ही आम्ही गाठलेल्या प्रत्येक अडचणीचे, आम्ही बांधलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रतीक आहे असं मला वाटतं. ही फक्त सुरुवात आहे माहित आहे की या प्रवासात उतार-चढाव आले, पण जिद्दीने पार करून अजून गोष्टी करण्याची ऊर्मी यातून मिळत आहे.’ Swapnil Joshi |
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी स्वप्नीलनं जॅग्वार ही अलिशान कार खरेदी केली होती. आता त्याच्या ताफ्यात आणखी एक आलिशान कार दाखल झाली आहे. स्वप्नील जोशीचा मोठा चाहता वर्ग आहेत. त्याने दुनियादारी, तू ही रे, प्यारवाली लव्हस्टोरी, मितवा असे अनेक चित्रपट केले आहे. नुकताच तो ‘नवरा माझा नवसाचा 2’मध्ये झळकला होता.
हेही वाचा :