बलात्कार प्रकरण : स्वामी चिन्मयानंद यांची सात तास चौकशी

नवी दिल्ली  – बलात्काराचा आरोप असणारे भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांची पोलिसांकडून तास कसून चौकशी करण्यात आली. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी सार्वजनिकपणे आरोप करत ब्लॅकमेल तसेच वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांकडून ही चौकशी करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांची जवळपास सात तास चौकशी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास समितीकडून (एसआयटी) ही चौकशी करण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांच्या नावे अनेक आश्रम आणि शैक्षणिक संस्था आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजता पोलिसांनी सुरु केलली चौकशी रात्री 1 वाजेपर्यंत सुरु होती. यावेळी त्यांनी मुलीकडून करण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारण्यात आले. मुलीने आपल्यावर बलात्कार करत त्याचा व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. तसेच त्या व्हिडीओची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण करण्यात आल्याचे आरोपात म्हटले आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्या वकिलांनी आपण पोलिसांनी तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे.

स्वामी चिन्मयानंद यांची चौकशी करण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप एसआयटीने फेटाळला आहे. आम्ही स्वामी चिन्मयानंद यांची चौकशी करत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही त्यांना तीन दिवसांपूर्वी समन्स बजावले होते. पण आम्हाला तब्बेतीचं कारण सांगण्यात आले. पुढील काही दिवस त्यांची चौकशी सुरु राहिल, अशी माहिती एसआयटीने दिली आहे.

दरम्यान, हा प्रकार गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत घडला. पण नंतर मुलीने व्हिडीओलाच पुरावा करत चिन्मयानंद यांच्याविरोधात जाण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात मुलीने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला आणि पळून गेली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबाची तक्रार दाखल करुन घेतली. मात्र यावेळी एफआयआर दाखल केला गेला नाही. नंतर मुलगी राजस्थानमध्ये सापडली. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांनी तिला न्यायालयात हजर करण्यास सांगितले. याप्रकरणी 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here