नवी दिल्ली : स्वामी चिन्मयानंद प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर आरोप करणारी आणि या प्रकरणातील पीडित विद्यार्थीनीला अटक करण्यात आली आहे. एसआयटीने आज सकाळी साडेआठच्या सुमारास मुलीला तिच्या घरातून अटक केली. वडिलांनी तिच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Uttar Pradesh Director General of Police, OP Singh: The law student, who had accused Swami Chinmayanand for sexually harassing her, has been arrested by the SIT (Special Investigation Team) for allegedly trying to extort money from him. pic.twitter.com/gtrC5lOjhp
— ANI UP (@ANINewsUP) September 25, 2019
मंगळवारी चिन्मयानंदवर बलात्काराचा आरोपी करणाऱ्या विद्यार्थीनीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, तिच्या अर्जावर 26 सप्टेंबरची पुढील तारीख निश्चित केली. म्हणजेच आता विद्यार्थीनीच्या जामिन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. चिन्मयानंद यांच्याकडून पीडित मुलीवर पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला होता तसेच यासंबंधीचा व्हिडिओदेखील समोर आला होता. याच आधारावर विद्यार्थिनी आणि तिच्या तीन साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याच गुन्ह्यात विद्यार्थीनीला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सोनू आणि विक्रम सिंग यांना एसआयटीने मंगळवारी पाच कोटींच्या खंडणीच्या मागणीसाठी अटक केली होती.