PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन सुरू केले होते आणि आज या मिशनला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. गांधी जयंतीदिनी स्वच्छ भारत मिशनच्या शुभारंभाला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीतील विज्ञान भवनात स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
यावेळी मोदी म्हणाले की, स्वच्छ भारत मिशनने लोकांना एकत्र आणले आहे. या अभियानांतर्गत लाखो लोक स्वच्छता अभियानात सहभागी होऊ लागले. कोणी शौचालय बांधण्यासाठी आपल्या शेळ्या विकल्या तर एका सैनिकाने आपले पेन्शन स्वच्छता अभियानासाठी दान केले. या खास प्रसंगी पीएम मोदी काय म्हणाले ते काही मुद्द्यांमध्ये जाणून घेऊया.
पंतप्रधान मोदी भावूक
आज आदरणीय बापू आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. भारतमातेच्या सुपुत्रांना मी विनम्र अभिवादन करतो. 2 ऑक्टोबर रोजी मी कर्तव्याच्या भावनेने भरलेला आहे आणि तितकाच भावनिक आहे. आज स्वच्छ भारत मिशनच्या प्रवासाने 10 वर्षांचा टप्पा गाठला आहे. स्वच्छ भारत मिशनचा प्रवास करोडो भारतीयांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. कोट्यवधी भारतीयांनी याला आपल्या जीवनाचा भाग बनवले आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे मनापासून आभार व्यक्त करतो. PM Narendra Modi |
देशभरात स्वच्छतेशी संबंधित कार्यक्रम आयोजित
आज देशभरात स्वच्छतेशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लोक आपली गावं, परिसर, शहरं, फ्लॅट, सोसायट्या मोठ्या उत्साहानं स्वच्छ करत आहेत. मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधीही या कार्यक्रमाचा एक भाग होत आहेत. .सेवा पखवाडा’च्या १५ दिवसांत देशभरात २७ लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सतत प्रयत्न करूनच आपण आपला भारत स्वच्छ करू शकतो.
स्वच्छ भारत मिशन जितका यशस्वी होईल…..
स्वच्छ भारत मिशनला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. स्वच्छ भारत मिशन जितके यशस्वी होईल तितका आपला देश उजळेल. आजपासून हजार वर्षांनंतर 21व्या शतकातील भारताचा अभ्यास केला जाईल तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण नक्कीच होईल.
स्वच्छतेसाठी 10,000 कोटी रुपयांचे प्रकल्प
आज या महत्त्वाच्या टप्प्यावर स्वच्छतेशी संबंधित 10,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. मिशन अमृत अंतर्गत पाणी आणि सीवरेज प्लांट बांधले जाणार आहेत. नमामि गंगेला जोडून किंवा कचऱ्यापासून गोबर गॅस तयार करण्यासाठी प्लांट बांधले जातील. PM Narendra Modi |
स्वच्छ भारत जगातील सर्वात मोठी जनआंदोलन
स्वच्छ भारत हे या शतकातील जगातील सर्वात मोठे आणि सर्वात यशस्वी जनआंदोलन आहे. या मिशनने मला जनतेच्या पाठिंब्याची खरी ऊर्जा दाखवली आहे. लग्नसोहळ्यापासून सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत सर्वत्र स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
60 ते 70 हजार मुलांचे प्राण वाचवले
देशात 12 कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली. स्वच्छ भारत मिशनचा देशातील सर्वसामान्यांच्या जीवनावर झालेला परिणाम अमूल्य आहे. स्वच्छ भारत मिशनमुळे दरवर्षी 60 ते 70 हजार मुलांचे प्राण वाचवले जात असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
पंतप्रधानांवर विरोधकांकडून झाली टीका
मागील सरकारने स्वच्छतेला देशाची समस्या मानली नाही. यासाठी मला टोमणेही मारले गेले की शौचालय आणि स्वच्छतेबद्दल बोलणे हे भारताच्या पंतप्रधानांचे काम नाही पण या मोहिमेने परिस्थिती बदलली. देशवासीयांचे सामान्य जीवन सुसह्य करणे हे भारताच्या पंतप्रधानांचे पहिले काम आहे. ही माझी जबाबदारी मानून मी टॉयलेट्स, सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल बोललो आणि त्याचा परिणामही आपण पाहत आहोत. स्वच्छ भारत मिशनने ही विचारसरणीही बदलली. सफाई कामगारांना सन्मान मिळाल्यावर त्यांनाही अभिमान वाटला.