#व्हिडीओ : अबब! स्वाभिमानीच्या उपसरपंचाकडे सापडले 75 लाख

कोल्हापूर – एक नोट एक वोट असं म्हणत निवडणूक लढवणाऱ्यांचा बुरखा फाटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यात संभाजीपुर ग्रामपंचायतीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपसरपंच बरकत गवंडी आणि त्यांचे भाऊ गणी गवंडी यांच्या दुकानावर आणि गोडाऊन वर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकला दुकानात तब्बल 75 लाख रुपये भरारी पथकाला आढळून आले ही रक्कम भरारी पथकाने आपल्या ताब्यात घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत इतक्या मोठ्या प्रमाणावर ती रक्कम सापडल्याने या निवडणुकीत पैशाचा बाजार करण्याच्या हेतूनेच इतकी प्रचंड रक्कम आणण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. छाप्यातच एवढी प्रचंड रक्कम सापडली असल्यामुळे यामागील बड्या माशांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली जात आहे

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील बाराव्या गल्लीत गवंडी टोबॅको या दुकानावरती ती आणि त्यांच्याच संभाजीपुर येथील गोडाऊन वरती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आणि जयसिंगपूर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला संभाजीपुर येथील कचरे सोसायटीमध्ये हे राहावयास असलेले संभाजीपुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बरकत गवंडी आणि त्यांचा भाऊ गणी गवंडी यांच्या दुकानावर आणि गोडाऊन वर टाकण्यात आलेल्या छाप्यात 75 लाख रुपयांची रक्कम आढळून आले आहे स्वाभिमानीचा उपसरपंच मोठ्या रकमेसह सापडल्याने या प्रकरणाची ची व्याप्ती वाढणार हे मात्र निश्चित आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आयकर विभाग आणि पोलीस करत आहेत.

https://youtu.be/rPaPItQK4Sc

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)