नांदेड – नांदेडमधील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाने महिले सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मित्राच्या पत्नीला डोळा मारणे, वारंवार फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टपाठवून गैरवर्तन केल्याचे प्रकार समोर आला आहे.
माधव देवसरकर असे या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाचे नाव असून नांदेडच्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.
पतीच्या माध्यमातून देवसरकर यास, सांगून देखील गैरवर्तन थांबले नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिसात याबाबाद तक्रार दिली. मात्र देवसरकर हे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असल्याने पोलिसांनी हे प्रकरण तपासावर ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी पिडीत महिलेने आणि पतीने घडलेली संपुर्ण प्रकार पत्रकारांना सांगितला.त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.