वानवडी, बिबवेवाडीत सुरू होणार स्वॅब कलेक्‍शन सेंटर

करोना संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या होणे आवश्‍यक

पुणे – करोनाची तपासणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत संशयित रुग्णांना सोईचे व्हावे, यासाठी स्वॅब कलेक्‍शन सेंटर उभारण्यात येत आहेत. सध्या शहरात 22 ठिकाणी सेंटर्स असून लवकरच वानवडी आणि बिबवेवाडी अशा दोन ठिकाणी स्वॅब कलेक्‍शन सेंटर्स उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली साबणे यांनी दिली.

शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येने 11 हजारांचा टप्पा ओलांडला असून, त्यामध्ये दररोज सरासरी
350 नवीन रुग्णांची भर पडत आहे. बाधितांवर उपचारासाठी शहरात सध्या 15 हजार बेड्‌स उपलब्ध आहेत. सध्या सुमारे 4 हजार जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी लवकरच लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ज्यांच्या घरी क्वारंटाइनची स्वतंत्र व्यवस्था होऊ शकते. त्यांच्यावर घरीच उपचार करण्याचेही नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, तत्पूर्वी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयितांच्या चाचण्या होणे गरजेचे आहे. त्यानुसार महापालिकेने मागील तीन आठवड्यांपासून स्वॅब सॅम्पल्स घेण्याचे प्रमाण वाढवले आहे. ही संख्या दररोज अडीच हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळेही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

कंटेन्मेंट एरिया वगळून अन्य भागातही रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची करोना टेस्ट घेण्यासाठी स्वॅब घेणे कठीण आहे. यासाठी प्रशासनाने स्वॅब सॅम्पल घेण्याची केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती डॉ. साबणे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.