कोपरगाव – शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना कोणत्याही परिणामाचा विचार न करता परखड मते मांडून देशहित साधले. एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती, असे गौरवोद्गार जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र सोनवणे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी गटनेते रवींद्र पाठक, कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय आढाव, माजी नगरसेवक डॉ. अजेय गर्जे यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाइं आदी पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.