नेवासा : नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुहासिनी किशोर मिसाळ यांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच रोहिणी नामदेव निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झालेले होते. रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडीसाठी सुवासिनी किशोर मिसाळ तसेच स्मिता देवेंद्र काळे यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये ऐनवेळी ग्रामपंचायतीच्या सर्व १७ सदस्यांनी सुवासिनी किशोर मिसाळ यांना बोट वर करून पाठिंबा दिल्याने मिसाळ यांची बहुमताने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुकाणा मंडलाधिकारी तृप्ती साळवे यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामपंचायत अधिकारी रेवन्नाथ भिसे यांनी सहकार्य केले. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
सासू सासऱ्यानंतर सुनेच्या खांद्यावर पडली सरपंच पदाची जबाबदारी….
एक वर्षांपूर्वी भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली होती या निवड प्रक्रियेत सुवासिनी किशोर मिसाळ या उमेदवार होत्या परंतु ऐनवेळेला झालेल्या घडामोडीत मिसाळ यांचे सरपंच पद हुकले होते परंतु यावेळी मात्र सुहासिनीचे सासरे अशोक दादा मिसाळ तसेच सासू लताबाई मिसाळ यांनी यशस्वीरित्या सरपंच पद सांभाळल्या नंतर सुनेच्या खांद्यावरही आता सरपंच पदाची जबाबदारी आली.सर्वांना बरोबर घेऊन तसेच माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले तसेच चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य गोरगरीबांच्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार.
सुहासिनी मिसाळ
नवनिर्वाचित सरपंच भेंडा बुद्रुक