पाकिस्तानातून सुटली समझोैता एक्‍स्प्रेस

लाहोर: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर बंद करण्यात आलेली समझोैता एक्‍स्प्रेसची सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आली असून आज पाकिस्तानच्या हद्दीतून भारतासाठी ही रेल्वेगाडी सोडण्यात आली. लाहोरहून दर सोमवारी आणि गुरूवारी ही रेल्वे भारतासाठी रवाना केली जाते. आज गाडीत दीडशे प्रवासी होते.

दिल्लीहून ही गाडी दर बुधवारी आणि रविवारी सुटते. दोन्ही बाजूंकडून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत असतो. पण सध्या दोन्ही देशांच्या दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या गाडीच्या प्रवाशांची संख्या चांगलीच रोडावली आहे. या गाडीला एकूण नऊ डबे असून त्यातील सहा स्लीपर कोच आहेत तर तीन एसी 3 टिअर डबे आहेत. सिमला करारानुसार 22 जुलै 1976 पासून ही रेल्वे सेवा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.