अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा ‘संशयास्पद’ मृत्यू

खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या अंटालीया या निवासस्थानाच्या बाहेर 20 जिलेटीन कांड्या असणारी स्कॉर्पिओ आढळल्याने खळबळ उडाली होती.

हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथे कळवा खाडीत सकाळी साडे दहाच्या सुमारास सापडला. ते गुरूवार सायंकाळपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबियांनी ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन हे पोलिस अधिकारी सचिन वझे यांच्या संपर्कात होते, असा आरोप केला होता. हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. वझे यांनी आपण हिरेन यांना भेटले असू शकतो पण आपल्याला नेमकेपणाने आठवत नसल्याचे सांगितले आहे.

हा मृतदेह सापडण्यामागे काहीतरी गौडबंगाल दिसत असल्याचे सांगून याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणामागे असणाऱ्या योगायोगांची मालिका संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हे प्रकरण फक्त गंभीर नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक आहे. इतकी माहिती जर माझ्याकडे येऊ शकते तर ती गृहमंत्र्यांकडे जाणार नाही असे मला वाटत नाही. त्यामुळे गृहमंत्री याबाबत स्पष्ट भूमिका का मांडत नाहीत हा प्रश्न आहे. सोबतच इतकी माहिती बाहेर आल्यानंतरही प्रकरण एनआयएकडे देणार की नाही हा देखील महत्वाचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

मनसुख हिरेन यांच्या व्हॉट्‌स ऍप कॉलची चौकशी केला पाहिजे. त्यामधून अनेक गोष्टी बाहेर येतील. मी राज्याला विनंती केली असून केंद्रालाही करणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आत्महत्या केल्याची ठाणे पोलिसांची माहिती

ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती एएनआयशी बोलताना दिली आहे.

तपासामध्ये विक्रोळ येथून ही गाडी घटनेच्या आधी 10 दिवस चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले होते. या स्कॉर्पिओवर बनावट नंबरप्लेट होती.

या शिवाय यात आणखी चार बनावट नंबरप्लेट मिळाल्या होत्या. अंबानी कुटुंबियांना देण्यात आलेल्या झेड पल्स सुरक्षेच्या ताफ्यातील गाड्यांच्या नंबर प्लेट होत्या, असे आढळून आले आहे. या गाडीचा क्रमांक निता अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्याच्या अग्रभागी असणाऱ्या गाडीचाच असल्याचे तपासात सामोरे आले आहे.

जिलेटिन स्टिक शिवाय या गाडीत एक पत्र सापडले. त्यात, निता अंबानी और मुकेश भय्या और फॅमिली एक झलक है ये अगली बार सामान पुरा कनेक्‍ट हो जायेगा ओरिजिनल गाडीमे आयेगा तुम पूरा फॅमिली को उडाने का इमतजाम हो गया है संभाल जाना असे त्यात लिहले आहे. टेलिग्रामवर या घटनेची जबाबदारी जैश उल हिंद या संगटनेने द्वीकारल्याचे पोलिस यंत्रणअंनी सांगितले. मात्र प्रत्यात ती खरी आहे का तपासाची दिशाभूल करण्यासाठी आहे याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.