Suchir Balaji | चॅटजीपीटी मेकर ओपनएआयचे व्हिसलब्लोअर सुचीर बालाजी सॅन फ्रान्सिस्कोमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला आहे. ओपनएआयवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचिर बालाजीच्या मृत्यूची 26 नोव्हेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना माहिती मिळाली.
परदेशी मीडियानुसार, सुचीर बालाजीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण काही संशयास्पद आढळून आलेलं नाही. सुचीर बालाजी मागच्या काही दिवसांपासून मित्रांच्या, सहकार्यांच्या संपर्कात नव्हता. त्यामुळे त्यांना चिंता वाटली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
सॅन फ्रान्सिस्को पोलीस 26 नोव्हेंबरला दुपारी 1 च्या सुमारास बालाजीच्या लोअर हाईट निवासस्थानी पोहोचले. तेव्हा अधिकाऱ्यांना सुचीरचा मृतदेह फ्लॅटमध्ये सापडला. अवघ्या 26 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. बालाजी यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांच्या माजी कंपनी ओपनएआयने केली आहे. Suchir Balaji |
सुचीर बालाजी यांनी त्याच्या मृत्यूच्या तीन महिन्यांपूर्वी जाहीरपणे OpenAI ने US कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. इंटरनेटच्या संपूर्ण इकोसिस्टिमच यामुळे नुकसान होईल अशी भिती सुचीर बालाजीने बोलून दाखवली होती.
ChatGPT ची निर्मिती Open AI द्वारे करण्यात आली आहे आणि जागतिक स्तरावर लाखो वापरकर्त्यांसह मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक यश अनुभवत आहे. 2022 च्या उत्तरार्धात हे ॲप लॉन्च केल्यामुळे लेखकांकडून अनेक कायदेशीर आव्हाने उभी राहिली होती. त्यावेळी, लेखक, प्रोग्रामर आणि पत्रकारांनी आरोप केला होता की कंपनीने त्यांचे ॲप विकसित करण्यासाठी त्यांच्या कॉपीराइट केलेल्या सामग्रीचा बेकायदेशीरपणे वापर केला होता. Suchir Balaji |
दरम्यान, ओपन एआयने चॅटजीपीटी बनवले असून जागतिक स्तरावर कोट्यवधी लोक चॅटजीपीटीचा वापर करतात. OpenAI चे हे प्रोडक्ट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलं आहे.
सुचीर बालाजी कोण आहे?
26 वर्षीय सुचीर भारतीय वंशाचा आणि अमेरिकेचा नागरिक होता. नोव्हेंबर २०२० ते ऑगस्ट २०२४ पर्यंत त्याने OpenAI सोबत चार वर्षे काम केले. सुचीर बालाजीचे बालपण कॅलिफोर्नियाच्या कूपर्टिनोमध्ये गेलं. त्यानंतर यूसी बर्कलमध्ये कॉम्प्युटर सायन्सच शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये शिकताना त्याला AI मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला होता. त्याने ओपनएआय आणि स्केल एआयमध्ये इंटर्नशिप केली. ओपनएआयच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वेबजीपीटीवर काम केले.
ओपनएआयमध्ये जवळपास चार वर्षे काम केल्यानंतर त्यांनी कंपनीसोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्याने चॅटजीपीटी योगदान देण्यासोबतच कंपनीतील चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवला होता. Suchir Balaji |