लखनौ – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह प्रयागराज येथील ब्रम्हगिरी मठात आढळला. गळफास घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासातील अनुमान आहे.
गिरी यांनी लिहलेली पाच पानी आत्महत्येची चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यात या आत्महत्येसाठी त्यांनी त्यांचे पट्ट शिष्य आनंद गिरी यांना जबाबदार धरले आहे. गिरी यांना हृषिकेश येथील एम्स रुगणालयात या वर्षी एप्रिलमध्ये करोना संसर्ग झाल्याने दाखल करण्यात आले होते.
बरे झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून पाठवण्यात आले होते. गिरी यांच्या मृत्यूनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.