पुणे : शहरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या संचारबंदी विषयी नागरिकांच्या अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. याच शंकांचे निरसन आता पुणे पोलीस करणार आहेत.
पोलीस आयुक्तांच्या कलम 144 आदेशाबद्दल तसेच वाहन विषयक आदेशाबद्दल नागरिकांच्या शंकांना उत्तर देण्यासाठी आणि विनंतीला प्रतिसाद देण्यासाठी पुणे पोलिसांनी खालील चार व्हाट्सॲप क्रमांक निर्धारित केले आहेत. 9145003100, 8975283100, 9169003100, 8975953100 हे चार क्रमांक पोलिसांनी निर्धारित केले आहेत.
नागरिकांनी विनंतीवर विचार केल्यानंतर, आपल्या शंकांना अथवा सूट देण्याच्या विनंती वरील उत्तर, आपल्याला त्याच व्हॉट्सॲप क्रमांकावरून संदेश स्वरुपात पाठवले जाईल. कृपया नोंद घ्या की, सूट ही केवळ अपवादात्मक परिस्थितीतच दिली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. पुणे पोलीसांनी पुणेकरांना सहकार्याची विनंती केली आहे.