नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन; ड्रग विक्रीसाठी मदत केल्याचा आरोप

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्याच कुख्यात गुंड आबू खानला ड्रग विक्रीसाठी मदत केल्याप्रकरणी नागपूर शहर पोलीस दलातील चार पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

साजिद मोवाल, शरद शिंपणे, निलेश पुरभे, मनोज ओरके अशी निलंबित पोलीस उपनिरीक्षकांची नावे आहेत, तर जयंता शेलोट आणि शाम मिश्रा अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुंड आबू खानशी संपर्क ठेवून त्याला अंमली पदार्थाची तस्करी आणि अवैध विक्रीसाठी मदत केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जयंता शेलोट, तर आबू खानसोबत पार्टीत नाचतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.
नागपूर पोलीस दलातील अधिकारी अंमली पदार्थाची तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगाराच्या सतत संपर्कात होते, हा धक्‍कादायक प्रकार चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही कारवाई केली. आबू खानच्या 1200 कॉल रेकॉर्डसमधून अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे क्रमांक समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)