पुणे : काेराेनामुळे संचारबंदी आणि लाॅकडाऊन सुरु असल्याने जीवानावश्यक सुविधा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, या दरम्यान काही ठिकाणी इतर छुपे व्यवहार सुरु आहेत. पुण्यातील एका किराणा दुकानात अशाचप्रकारे तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकानदाराला कारवाईची भिती दाखवत दाेन पाेलीस कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली.
दुकानदाराने सदर पाेलीसांना दाेन हजार 300 रुपये दिले मात्र, सदर प्रकार उघडकीस आल्याने संबंधित दाेन्ही पाेलीस कर्मचााऱ्यांचे निलंबन करण्याचा आदेश पाेलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिला आहे.पाेलीस शिपाई हर्षद नामदेव मांढरे आणि सागर दत्तात्र्य सूर्यवंशी असे निलंबित पाेलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत.