कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; भारताचा मोठा विजय

हेग : हेरगिरी केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आज महत्वाचा निकाल दिला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम ठेवली आहे. १५-१ च्या फरकाने हा निकाल लागला आहे. यापूर्वी २०१७मध्ये आयसीजेने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती, त्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी हे भारताचे राजनैतिक यश असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मे 2017 मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.

आता न्यायालयाने आज परत भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. या प्रकरणात हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानी सैन्याने मार्च 2016 मध्ये जाधव यांना बलुचिस्तानमधून ताब्यात घेतले होते. मात्र, भारताने पाकचा हा दावा नेहमीच नाकारला आहे. भारताने म्हटले आहे की, जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते. त्यांचे इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानात आणण्यात आले होते. जाधव यांचा इराणमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा दावा करीत आयसीजेमध्ये खटला दाखल केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)