डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी सहायक आयुक्‍त विवेक राहींचे निलंबन

मुंबई : मुंबईच्या डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आता मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. त्यातील पहिली कारवाई मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्‍त विवेक राही यांच्यावर करण्यात आली असून त्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. पालिका आयुक्‍त प्रविणसिंह परदेशी यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यापुर्वी परदेशी यांनी सध्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते परंतु, परदेशी यांनी अचानक सध्या कार्यरत असलेल्या राही यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबईतील डोंगरीच्या केसरबाई ही 100 वर्षापुर्वीच्या इमारतीचा अर्धा भाग कोसळला होता. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.