राजीव सक्‍सेना यांना विदेशात जाण्याच्या परवानगीला स्थगिती 

नवी दिल्ली – ऑगस्ता वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील माफीचा साक्षीदार रजीव सक्‍सेन यांना वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात जाण्याला दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या परवानगीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. राजीव सक्‍सेना यांना रक्‍ताचा कर्करोग आणि अन्य व्याधींवर उपचार घेण्यासाठी 25 जून ते 24 जुलै दरम्यान संयुक्‍त अरब अमिराती, ब्रिटन आणि युरोपामध्ये जायला दिल्ली उच्च न्यायालयाने 10 जून रोजी परवानगी दिली होती. मात्र सक्‍तवसुली संचलनालयाने या आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सुटीकालीन पिठाने दिल्ली हायकोर्टाच्या आदेशांना स्थगिती देऊन सक्‍सेना यांना नोटीसही बजावली. 3,600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅन्ड गैरव्यवहार प्रकरणी सक्‍सेनाविरोधात “ईडी’ने आरोपपत्र दाखल केले आहे. नंतर सक्‍सेना माफीचा साक्षीदार बनण्यास तयार झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.