पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण मोहिम स्थगित

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण कार्यकर्त्यांवर वारंवार हल्ले व्हायला लागल्यामुळे सरकारने ही मोहिम स्थगित केली आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेबरोबर या मोहिमेच्या मूल्यमापन करणाऱ्या उपक्रमालाही पाकिस्तान सरकारने स्थगिती दिली आहे. देशभरात 5 वर्षे वयाखालील 3 कोटी 90 लाख बालकांना पोलिओच्या विषाणूपासून संरक्षण देणाऱ्या औषधांचे डोस पाजण्यासाठीच्या मोहिमेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. तर शुक्रवार हा  मोहिमेचा अखेरचा दिवस ठरला. या लसीकरण मोहिमेनंतर या मोहिमेच्या यशाचे मूल्यमापन करण्यात येणार होते.
मात्र देशभरातील ही मोहिम राबवण्यासाठी तब्बल 2 लाख 60 हजार कार्यकर्त्यांना या मोहिमेदरम्यान मोठ्या आपत्तींना सामोरे जावे लागले. पोलिओचे डोस पाजल्यानंतर पेशावरमधील अनेक ठिकाणी बालकांना अत्यवस्थ वाटायला लागले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. वायव्य पाकिस्तानात या पोलिओ पथकाच्या संरक्षणार्थ असलेल्या सुरक्षा रक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एका अन्य घटनेत बलुचिस्थानातल्या चमन भागात एक महिला कार्यकर्तीची हत्या झाली, आणि अन्य एक जण जखमी झाला.

पोलिओ डोस सुरक्षित असल्याचे स्पष्टिकरण पंतप्रधान इम्रान खान यांनी दिले आहे. मात्र तरिही कार्यकर्त्यांवर हल्ले सुरूच आहेत. जगभरात पोलिओचे रुग्ण सर्वात जास्त आढळणाऱ्या तीन देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. यापूर्वीही पोलिओ लसीकरणाची मोहिम थांबवली गेली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.