#व्हिडीओ : पुलावामासारखा दहशवादी हल्ला घडविण्याचा कट जवानांनी उधळला 

श्रीनगर – जम्मू-आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्यासारखा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी जम्मू-राजौरी महामार्गाला आपले लक्ष्य केले होते. सुदैवाने, सुरक्षा दलांना याबाबत माहिती मिळाल्याने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात आला.

सूत्रानुसार, जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन ऑलआउटमुळे दहशतवादी पूर्णपणे संतापले आहेत. मागील १८ दिवसात १८ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. यामुळे दहशतवादी सुरक्षा दलाच्या जवानांना निशाणा बनवत आहेत. जम्मू-राजौरी महामार्गावरून जाणाऱ्या जवानांना लक्ष बनविण्यात येणार होते. परंतु, महामार्गावर गस्तीवरील सुरक्षा दलाच्या एका गटाला संदिग्ध आयईडी स्फोटके आढळून आली. यानंतर भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने एक संयुक्त ऑपरेशन राबवत आयईडी स्फोटके निकामी आली आहेत. महामार्गावरील वाहतूक सध्या थांबविण्यात आली आहे.

दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. अशाप्रकारचे आणखी हल्ले घडण्याची माहिती गुप्तचर संघटनांनी दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.