मंगळुरू : मंगळुरु विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शनिवारी उडपीला नेले. तेथे त्याचे बराच काळ वास्तव्य होते. तेथे बॅंकेत त्याचे खाते आणि लॉकर आहे, त्याची माहिती घेण्यात आली आहे.
बॅंकेतील तपास संपल्यानंतर त्याला तो रहात असलेल्या आणि अलीकडे काम करत असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. त्यापुर्वी त्याला केंजार येथील एका सलूनमध्ये नेण्यात आले. तेथे त्या मालकाने त्याला ओळखले. त्याने एक बॅग आत ठेवण्याची विनंती केली मात्र मी त्याला बाहेर ठेवण्यास सांगितले. विमान तळावरून आल्यानंतर तो तीबॅग घेऊन परत गेला, असे त्या नाभीकाने सांगितले.
हा बॉम्ब बनवण्यासाठी त्याने चेन्नईतील जेथून सामुग्री केली तेथेही त्याला नेण्यात आले. या आरोपीने 22 जानेवारीला पोलिसांपुढे शरणागती स्वीकारली आहे. त्याला तपासाठी दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.