मंगळूरु विमानतळावरील बॉम्बमागील संशयिताचे आत्मसमर्पण

बेंगळूरु :  मंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब पेरण्याचा संशय असलेल्या 35 वर्षीय युवकाने अज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. येथील रहिवासी आहे, असे पोलिसांनी सांगितले. सीसीटिव्हीमध्ये ज्या संशयित व्यक्‍तीचा चेहरा दिसतो आहे, त्याच्याशी याचा चेहरीा जुळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तो आज सकाळी पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात गेला. तेथे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचची आणि प्राथमिक चौकशी करण्यात आली, असे ते म्हणाले. विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे या संशयिताने कबूल केले आहे.

त्याने इंटरनेटवरून स्फोटके बनवण्याची माहिती मिळवली होती, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र स्फोटकांसाठी वापरल्या जाणारे साहित्य, तो बॉम्ब कसा तयार करू शकला आणि तो कोठून आणला याविषयीही चौकशी सुरू आहे.

त्याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि ट्रान्झिट वॉरंट बजावण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी त्याला ताब्यात घेण्यासाठी मंगळरु येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

यापूर्वी त्याला 2018 मध्ये बेंगळुरू विमानतळावर बॉम्बची अफवा पसरवल्याबद्दल अटक करण्यात आली होती, त्यासाठी त्याला सहा महिन्यांसाठी तुरूंगात टाकण्यात आले होते. बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षारक्षकाची नोकरी नाकारली गेल्यामुळे सूड घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.