नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पाच जानेवारीला बुरखेधारी गुंडांनी केलेल्या हल्ला केला होता. त्याच दिवशी निर्माण केलेल्या युनिटी अगेन्स्ट लेफ्ट या व्हॉटस् ऍप ग्रुपवरील 60 पैकी 37 जणांची ओळख पटवली आहे. या ग्रुपचा हल्ल्याशी सबंध असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जानेवारीला डाव्या पक्षांच्या विरोधात व्हॉटस् ऍपवर एक ग्रुप स्थापन करण्यात आला. त्याच दिवशी जेएनयुमध्ये हिंसाचार घडला. त्यादिवशी बुरखेधारी स्त्री अणि पुरूषांच्या जमावाने लोखंडी रॉड आणि लाठ्या घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. त्यात 34 जण जखमी झाले.
एनडिटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ओळख पटवलेल्यांपैकी 10 जण विद्यापीठाशी संबंधित नाहीत. म्हणजे ते या विदयापीठातील विद्यार्थी नाहीत.पोलिसांनी शुक्रवारी या हल्ल्यात सहभागी झालेल्यांची ओळख पटवलेल्या नऊ जणांची नावे सांगितली.
त्यात विद्यार्थी संघटनांच्या अध्यक्षा आईशी घोष हीचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. पोलिसांच्या या दाव्याला आईशीने तातडीने प्रत्यूत्तर दिले होते.
या शिवाय पोलिसांनी या हिंसाचारात स्टुडंटस् फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंटस असोसिएशन आणि डेमोक्रेटीक स्टुडंटस् फेडरेशन या संघटना सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.