बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन भलेही चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप ऍक्टिव असते. तिच्या इंस्टाग्रामवर नुकत्याच झालेल्या व्हिडिओमुळे सुष्मिता चर्चेत आली आहे. यामध्ये ती आपल्या मुलींबरोबर अफलातून डान्स करताना दिसत आहे.
सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्रामवर 8:32 मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुष्मिताचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांनाही खूप पसंत पडला असून त्यांनी तिचे आणि मुलींच्या डान्सचे कौतुक केले आहे.
या व्हिडिओमध्ये आई-मुली नाचत असताना, सुष्मिताचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल त्यांचा डान्स पाहत बाजूला बसला आहे. यापूर्वीही सुष्मिताने तिचा वर्कआउट व्हिडिओ आणि काही छायाचित्रेही पोस्ट केली होती. ज्यात चौघेही दिसत आहेत.
सुष्मिता फिटनेसबाबत खूप जागरूक आहे आणि बऱ्याचदा वर्कआउटचा व्हिडिओ पोस्ट करत असते. दरम्यान, सुष्मिता ही रोहमनसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिली आहे. कधी ती रोहमनबरोबरचे व्यायामाचे व्हिडिओ, तर कधी प्रवासाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याने प्रसिद्धीच्या झोतात असते.