सुष्मिता सेनचा बॉयफ्रेंड रोहमन यांच्याशी सारखपुडा?

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आपला बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांच्यासोबतच्या रिलेशनशिपबाबत खूपच सीरियस आहे. हे सुष्मिताच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिसून येते. त्या दोघांमधील प्रेमसंबंध हे त्यांच्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येते. तसेच सुष्मिताच्या लेटेस्ट फोटोवरून दोघांचा सारखपुडा झाला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सुष्मिताने आपल्या इंस्टाग्रामवर रोहमनसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. यात हे कपल नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. पण या फोटोत विशेष लक्ष जाते ते सुष्मिताच्या बोटात असलेला सुंदर अशा अंगठीकडे. सुष्मिताने आपल्या रिंग फिंगरमध्ये नीलम आणि डायमंडची एक सुंदर अशी अंगठी घातलेली आहे.

या फोटोसोबत सुष्मिताने शेअर केलेला मॅसेजही खूपच रोमांटिक आहे. यातून रोहमनबाबत असलेले तिचे प्रेम व्यक्‍त होते. “कोणावर कोणतीही अट न ठेवता प्रेम करणे खूपच कठिण आहे. कारण आपल्याला अटी लादण्याची सवय असते. आपले हृदय अटीवर चालते, तर मन विश्‍वासाला जन्म देते.’ सुष्मिता म्हणते, तर मैत्री, प्रेम, सम्मान, विश्‍वास, साथ आणि मनाचे ऐकण्यासाठी मी विनाअट तुझी आहे रोहमन शॉल. आय लव यु गाइज…!

या रोमांटिक पोस्ट आणि सुष्मिताच्या बोटातील सुंदर अशा अंगठीवरून दोघांमधील सीक्रेट कायम आहे. परंतु या कपलने त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली, हे नक्‍की!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.