मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला ह्रदयविकाराचा झटका आला. सुष्मिताने नुकतीच एक पोस्ट शेअर करून सांगितले की, तिला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. आता मात्र तिची प्रकृती ठीक आहे. सुष्मिताने तिच्या वडिलांसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
सुष्मिता सेनने नुकताच तिचे वडील सुबीर सेन यांच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोसोबत सुष्मिताने सांगितले की, ‘भूतकाळात ती किती वाईट परिस्थितीतून गेली आहे. तिची तब्येत किती बिघडली? सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला, तिची अँजिओप्लास्टी झाली. सध्या सुष्मिताची प्रकृती ठीक आहे.’
सुष्मिताने तिच्या पोस्टच्या कॅप्शनची सुरुवात तिच्या वडिलांच्या शब्दाने केली. सुष्मिताने लिहिले,’तुमचे हृदय मजबूत आणि आनंदी ठेवा आणि ते तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत उभे राहील. जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते. ही महान ओळ माझ्या वडिलांनी सांगितली होती. दोन दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझी अँजिओप्लास्टी झाली. हृदय आता सुरक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्या हृदयरोगतज्ज्ञांनी पुष्टी केली आहे की माझे हृदय खरोखर मोठे आहे.’
सुष्मिताने पुढे लिहिले,’असे बरेच लोक आहेत ज्यांचे मी आभार मानू इच्छिते. त्यामुळे मला वेळेवर उपचार मिळू शकले. त्याच्या तत्परतेमुळे मी सावरले. तेही मी पुढच्या पोस्टमध्ये सांगेन. मी ही पोस्ट फक्त माझ्या प्रियजनांना अपडेट देण्यासाठी केली आहे. आणि मी आता ठीक आहे ही चांगली बातमी सांगण्यासाठी… मी माझे आयुष्य मुक्तपणे जगण्यास तयार आहे.’ सुष्मिता सेनच्या प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री आर्या 2 चे शूटिंग करत होती. अलीकडेच तिने याचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे.