सुषमाजी, तुम्ही मला दिलेलं वचन पाळलं नाही -स्मृति इराणीही झाल्या भावूक

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्‍यानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षातले आणि त्यांचे कट्टर विरोधकही हळहळल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भावूक ट्विट केले आहे.

स्मृती इराणी यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला एक तुमच्याशी एक तक्रार आहे. मला लंचवर नेण्यासाठी तुम्ही बासुरीला एक हॉटेल निवडायला सांगितलं होतं. परंतु तुम्ही मला दिलेलं वचन पाळलं नाहीत. तुम्ही आम्हाला सोडून निघून गेलात, अशा आशयाचं ट्विट स्मृती इराणी यांनी केलं आहे. बासुरी या सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. स्मृती इराणी आणि सुषमा स्वराज यांचे कौटुंबिक संबंध होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×