सुषमा स्वराज यांनी मागवला अहवाल

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – जर्मन नागरिक फेडरिक इरिना ब्रुनिंग उर्फ सुदेवी दासी यांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यास नकार दिल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. सुदेवी दासी या गेल्या कित्येक वर्षांपासून मथुरेत गोसेवा करत आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेण्यासाठी त्यांना पद्‌मश्री किताबाने गौरवण्यात आलेले आहे. ब्रुनिंग यांचा व्हिसा 25 जून रोजी संपणार आहे.

मात्र त्यानंतर व्हिसाला मुदतवाढ मिळावी यासाठी ब्रुनिंग यांनी केलेला अर्ज विदेश मंत्रालयाने फेटाळला आहे. व्हिसाल मुदतवाढ मिळणार नसल्याने ब्रुनिंग यांनी आपला पद्‌मश्री किताब परत देण्याचा इशारा दिला आहे. या संबंधीचे वृत्त प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यावर सुषमा स्वराज यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.

“हे प्रकरण नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. या संबंधीचा अहवाल मी मागवला आहे.’ असे स्वराज यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. एका अन्य ट्‌विटमध्ये सुषमा स्वराज यांनी स्पेनमधील बार्सिलोना इथे अडचणीत सापडलेल्या एका भारतीय महिलेलाही मदत करण्याचे आश्‍वासन स्वराज यांनी दिले. बार्सिलोना येथील विमानतळाबाहेर या महिलेचा आणि तिच्या मुलाचा पासपोर्ट चोरट्यांनी चोरून नेला. त्यानंतर या महिलेने सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीचे आवाहन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)