बीड : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सत्ताधारी – विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आज परळीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात लाडकी बहीण प्रीतम मुंडे यांच्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभेची जागा सोडावी अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
काय म्हणाले सुषमा अंधारे?
लाडकी बहीण प्रीतम मुंडे यांच्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीची विधानसभा जागा सोडून द्यावी असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. त्या बीडच्या परळी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी त्यांनी सरकारवर चौफेर टीका केली. तसेच बीड जिल्ह्यात विधानसभेच्या अनुषंगाने तीन विधानसभा मतदारसंघावर सुषमा अंधारे यांनी दावा केला आहे.
पंकजा मुंडेंवरदेखील केली टीका
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी परंपरागत राखून ठेवलेला परळी मतदारसंघ लोकांशी नाळ तुटल्याने गमावलेला आहे असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.