Sushma Andhare Ashok Chavan | केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राज्यासह देशभरात संताप निर्माण झाला आहे. विरोधकांनी तर अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी करत आंदोलन केले. शाहांच्या विधानाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही पडले आहेत. विरोधकांच्या या भूमिकेविरोधात अमित शाहांचा बचाव करण्यासाठी भाजपानेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. असे असतानाच भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या हातातील एका पोस्टरचा संदर्भ घेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अंधारे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.
सुषमा अंधारेंकडून अशोक चव्हाणांचा फोटो शेअर Sushma Andhare Ashok Chavan |
सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अशोक चव्हाण यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चव्हाण यांच्या हातात एक पोस्टर आहे. या पोस्टवर ‘काँग्रेसने किया बाबासाहेब आंबेडकरजी का अपमान. बाबासाहेब आंबेडकरजीको दो बार चुनाव हराया… काँग्रेस माफी मांगो’ असे लिहिलेले आहे. याच पोस्टरवर सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर अंधारे यांनी,”अशोकरावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही. यालाच म्हणतात, खायचं कुडव्याच आणि गायचं उडव्याचं. एवढा मोठा साक्षात्कार आपल्याला काँग्रेस कडून मुख्यमंत्रीपद उपभोगताना का बर झाला नाही ? सध्या आपल्याला 66 वे वर्ष चालू आहे. वय वर्ष 65 होईपर्यंत आपल्या दोन पिढ्या याच काँग्रेसच्या लाभार्थी राहिल्या. तेव्हा हे तत्त्वज्ञान का सुचलं नाही? “असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
आत्ता तुम्हाला हे शेंड्यावरचं शहाणपण सुचतंय का? Sushma Andhare Ashok Chavan |
तसेच, काँग्रेसने दिलेले मुख्यमंत्रिपद त्याचवेळी त्यांच्याच तोंडावर भिरकावून देत हा फलक तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरूपानी हातात का घेतला नाही ? ज्या काँग्रेसच्या नावाने फलक हातात घेतला आहे, त्या काँग्रेसच्याच जीवावर शाळा, कॉलेज, डेअरी, डाळ मिल, ऑइल मिल, पेपर मिल, साखर कारखाने, मेडिकल कॉलेज, करोडोचे टेंडर्स, लाभाच्या जागा, पुढच्या पाच-पन्नास पिढ्यांना पुरेल एवढी जायदाद कमवल्यावर आत्ता तुम्हाला हे शेंड्यावरचं शहाणपण सुचतंय का? असंही सुषमा अंधारे यांनी विचारलंय. “इथे मुद्दा काँग्रेसने काय केलं किंवा भाजपने काय केलं हा असूच शकत नाही. मुद्दा एका तडीपार माणसाकडून बाबासाहेबांच्या संदर्भाने झालेला उल्लेख यावर तुमची काय भूमिका आहे ते आधी सांगा,” असे आव्हानच अंधारे यांनी अशोक चव्हाण यांना केले आहे. दरम्यान , आता अशोक चव्हण यांच्याकडून अंधारे यांना नेमकं काय उत्तर दिले जाते हे पाहणे गरजेचे आहे.
हेही वाचा
“माझ्या वडिलांना जसं ठार केलं तेवढीच कठोर शिक्षा आरोपींना द्या” ; संतोष देशमुख यांच्या मुलीची मागणी