सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट – भाजपा कडून दिली होती ऑफर

सोलापूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज गौप्यस्फोट करत मला आणि प्रणितीला भारतीय जनता पक्षात येण्याची ऑफर दिली होती असे म्हंटले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्याने प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली होती आणि मला देखील भारतीय जनता पक्षात येण्याचा आग्रह धरला होता असे सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले.

पुढे बोलताना आमच्या रक्तातच काँग्रेस असून मरेपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार, भारतीय जनता पक्ष हा जातीधर्माचे राजकारण करत आहे. त्यांचा हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका यावेळी सुशीलकुमार शिंदेंनी केली आहे. या निवडणुकीत लोक भाजपाला पराभूत करतील असेही ते म्हणाले.

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.