सुशांत सिंग राजपूतचे होर्डिंग श्रीलंकेत, बहीण श्वेता म्हणाली.. ‘THANK YOU SHRILANKA’

नवी दिल्ली- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आता चार महिने लोटली आहेत. हत्या की आत्महत्या यावर अजूही शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र त्याचे चाहते आणि बहीण श्वेता सिंग किर्ती त्याला न्याय मिळावा म्हणून सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात.

श्वेता काही दिवत सतत याबद्दल सोशल मीडियावर कॅम्पेन चालवत होती. त्याबाबतचे फोटोसुद्धा शेअर करत  होती. आता तिने एक फोटो शेअर केला आहे. त्यात सुशांत सिंगचं होर्डिंग आहे. हे चाहत्यांनी श्रीलंकेत लावलेलं आहे.  सुशांतला न्याय मिळवण्यासाठी आता श्रीलंकेतही आजाव उठतो आहे, असं होर्डिंगचा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे.

काही फोटो ट्विट केले आहे आणि धन्यवाद श्रीलंका असं त्याला कॅप्शन दिले आहे. या फोटोला सुशांतच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहे. खरंतर त्याचे चाहते याबाबत येणाऱ्या निर्णयाची वाट बघत आहे. अनेकांनी जस्टीस फॉर सुशांत असं, कँम्पेन देखील सोशल मीडियावर चालवलं होतं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.