मुंबई – अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयला मदत करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांची जी एक फॉरेन्सिक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा दोन दिवसांपूर्वी दिला आहे.
दरम्यान, एम्स रुग्णालयाच्या या महत्त्वाच्या निर्णयाबाबत सुशांतची बहीण ‘श्वेता सिंह’ हिने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. श्वेता ने आपल्या ट्विटर अकाउंटवर सुशांतचा एक फोटो शेअर केला असून, “आम्ही जिंकू….’ असं तिने म्हंटल आहे.
We Will Win! 🔱 pic.twitter.com/LZSrqEpBGC
— Shweta Singh Kirti (@shwetasinghkirt) October 3, 2020
दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणी श्वेताने अद्यापही माघार घेतली नसल्याचं दिसत आहे. सुशांतला न्याय देण्याची तिची लढाई संपलेली नाही. एम्सने दिलेल्या रिपोर्टवर सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.