सुशांतच्या बहिणीची ईडीकडून चौकशी

मुंबई -अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसत्र कायम ठेवले आहे. त्यानुसार ईडीने मंगळवारी सुशांतची बहीण मितू सिंह आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी यांची चौकशी केली.

सुशांतच्या चार बहिणींपैकी एक असणारी मितू ईडीच्या समन्सवरून चौकशीसाठी हजर झाली. तिच्या रूपाने सुशांतच्या कुटूंबातील व्यक्ती प्रथमच चौकशीला सामोरी गेली. त्याशिवाय, सुशांतचा रूममेट सिद्धार्थ आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली.

ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणात सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला प्रमुख आरोपी केले आहे. रियाबरोबरच तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि भाऊ शोविक यांचीही याआधी चौकशी झाली.

रिया आणि तिच्या कुटूंबीयांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्‍यता आहे. रियाने सुशांतचा पैसा हडप केल्याचा संशय आहे. त्यामुळे रियाचे उत्पन्न, गुंतवणूक आणि व्यावसायिक करारांची छाननी ईडीकडून होणार असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.