मुंबई -हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते.
सुशांत सिंगचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या यावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. त्याचा मृत्यू गळफासामुळे झाला की विषप्रयोगामुळे झाला, यासंबधीचे अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु होते. मात्र आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम देणारा एक अहवाल समोर आला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांच्या एका समितीने एक अहवाल दिला आहे. या अहवालानुसार सुशांत सिंग राजपूतची हत्या नसून आत्महत्या केली आहे. असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सुशांत सिंह राजपूत का मर्डर नहीं हुआ, एम्स की फॉरेंसिक रिपोर्ट में आत्महत्या पर लगी मुहर#SushantSinghRajput #AIIMShttps://t.co/5fXbta2EsC pic.twitter.com/bmdHs1xgtg
— BollyHungama (@Bollyhungama) October 3, 2020
दरम्यान, सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस अद्याप करत आहेत. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी पोलीस, ईडी सुप्रीम कोर्ट सर्वत्र तपास, याचिका, खटले सुरू आहेत.