मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणामध्ये नाव आलेला संदीप सिंह हा व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच आज काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.
या भेटीबाबतचा तपशील सांगताना गृहमंत्री देशमुख यांनी, “काँग्रेस शिष्टमंडळाने भाजप, संदीप सिंह, मादक द्रव्यांचा पुरवठा व पंतप्रधानांचा बायोपिकचे दिग्दर्शन करणाऱ्या संदीप सिंह यांच्यादरम्यान काय संबंध आहे याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी केली. मी काँग्रेस शिष्टमंडळाची विनंती सीबीआयकडे सुपूर्द करणार आहे.” अशी माहिती दिली.
तत्पूर्वी काल कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी, मादक द्रव्यांचा पुरवठा करण्याच्या संबंधात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली संदीप सिंह नावाची व्यक्ती ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या अंत्यत निकटच्या संपर्कात असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मोदींवर जो चित्रपट काढण्यात आला होता त्या चित्रपटाचेही तेच निर्माते आहेत.
सुशांतसिंह प्रकरण घडल्यानंतर संदिपसिंह यांने महाराष्ट्र भापच्या कार्यालयात गेल्या काहीं महिन्यात 53 फोन कॉल्स केले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर संदिपसिंह आणि भाजपचे नेमके काय कनेक्शन आहे याची चौकशी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले होते.
A Congress delegation met with me & urged to probe as to what is relation between BJP & Sandip Singh & drugs & Sandip Singh who produced PM Modi’s biopic. I will forward this request to CBI (which is probing Sushant Singh Rajput’s death): Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/QdlMFSk1za
— ANI (@ANI) August 31, 2020