सुशांत मृत्यू प्रकरण : एनसीबीच्या पथकात कोरोनाचा शिरकाव; तपास मंदावला

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला अंमली पदार्थांची किनार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील या हाय प्रोफाइल ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी अंमली पदार्थविरोधी पथक अर्थात एनसीबीने मोर्चा सांभाळला आहे. एनसीबीच्या हाती अनेक महत्वाचे दुवे आले असतानाच आता तपासाचा वेग काहीसा मंदावल्याने पाहायला मिळत आहे.

पथकातील एक अधिकारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर तपासाचा वेग मंदावल्याने कळते. यानंतर एनसीबीच्या पथकातील इतर सर्व सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याबरोबरच सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अधिकारी कोरोना बाधित निघाल्याने चौकशीसाठी बोलाविण्यात आलेल्या सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, टेलेन्ट मॅनेजर जया सहा यांना परत पाठविण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.

तत्पूर्वी, एनसीबीतर्फे सुशांत मृत्यू प्रकरणाशी संबंधित असलेल्या ड्रग रॅकेटप्रकरणात १८ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचा देखील समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.