मुंबई – दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या शेजाऱ्याला एनसीबीने म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. ड्रग्ज तस्कर साहिल शाह उर्फ फ्लैको असे त्याचे नाव आहे. फ्लैको मागच्या 8 महिन्यांपासून फरार होता.
या प्रकरणी येत्या काही दिवसात एसीबी अधिक तपास करणार आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अटक करण्यात आलेला आरोपी गणेश शेरे आणि सिद्धांत अमीन यांच्याकडे 25 लाख रुपये किमतीचा 310 ग्रॅम गांजा आणि 1.5 लाख रुपये जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणी फ्लैकोचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. गणेश शेरे याने चौकशी दरम्यान फ्लैकोबाबतची माहिती दिली. या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालाडच्या फ्लॅटवर छापा टाकला पण तेव्हा तो त्या जागी नव्हता. मात्र आज त्याला अटक केली आहे.