मुंबई – राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यावरुन नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची धाड पडणार असल्याचा इशारा दिला आहे.
खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी
लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.— Narayan Rane (@MeNarayanRane) February 18, 2022
या ट्विटमध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्याविषयी उल्लेख करण्यात आला आहे. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंह आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच दिशा सालियनवर सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोपही राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. मातोश्रीमधील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
हे ट्विट राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासाठी “महत्वाची बातमी’ असे म्हणत केले आहे. तसेच ईडीची नोटीस आल्यावर विनायक राऊत आपले “बॉस’ आणि आपण कुठे धावणार ? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला आहे.