दरवर्षी प्रत्येक क्षेत्रातील 50 व्यक्तींची “मोस्ट डिजायरेबल’ यादी प्रसिद्ध होते. या सर्व क्षेत्रांमधील 40 वर्षांखालील व्यक्तींची निवड केली जात असते. त्यामध्ये 2020 या वर्षासाठी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची निवड करण्यात आली आहे.
ऑनलाइन रॅंकिंग आणि इंटरनॅशनल ज्यूरीच्या निवडीच्या आधारे ही निवड केली जात असते. सुशांत सिंह राजपूत एक चांगला अभिनेता तर होता, पण त्यबरोबर तो एक दार्शनिकदेखील होता. ज्योतिष आणि खगोलशास्त्र या विषयांमध्ये त्याला विशेष गती होती.
तो वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकेही वाचत असायचा. विज्ञानात रस असल्यामुळे त्याने “नासा’ आणि न्यूक्निअर रिसर्चो लॅब सर्नलाही भेट दिली होती.
गेल्या वर्षीच्या मोस्ट डिजायरेबल मॅनच्या यादीमध्ये विजय देवरकोंडा, आदित्य रॉय कपूर, विक्की कौशल, डल्कर सलमान, विराट कोहली, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, गुरफाते सिंह पिरजादा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची नावे आहेत.