“होय… या तारखेला सुशांत-रिया भेटले होते”, सुशांतच्या अत्यंंत जवळच्या व्यक्तीने केला खुलासा

मुंबई- सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी रिया आणि सुशांतची भेट झाली होती, हे सांगणारा साक्षीदार सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाला  वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने हा मोठा खुलासा केला आहे.

श्वेता किर्ती सिंह हिने या संदर्भात ट्विट करत खुलासा केला आहे. ही गेमचेंजर बातमी आहे. रिया माझ्या भावाला 13 जूनच्या रात्री भेटली होती, हे सांगणारा एक साक्षीदार आहे. 13 जूनच्या रात्री नेमकं काय झालं होतं, ज्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 जूनला सकाळी माझा भाऊ मृतावस्थेत सापडला?, असं तिने ट्विटमध्ये लिहीलं आहे.

रियाने आपण 8 जूनला सुशांतचं घर सोडलं. तेव्हा त्याची बहीण मीतू त्याच्यासोबत राहायला आली होती. त्यानंतर सुशांतला मी भेटलेच नाही, असं रियाने सांगितलं. मात्र आता श्वेता सिंह किर्तीच्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. हा साक्षीदार म्हणजे सीबीआयच्या तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.