मुंबई – स्टॅंड अप कॉमेडिअन कुणाल कामरा हा नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतो. यावेळी तो पुन्हा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे. कुणाल लवकरच ‘शटअप या कुणाल – २ ’ कार्यक्रमाचा दुसरा सिझन सुरु झाला आहे. यातच कुणालने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोमध्ये आमंत्रित केलं आहे. या खास मुलाखतीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं
संजय राऊत म्हणाले,’सुशांतला मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचा होता. बिहारमध्ये असताना त्याला कोण ओळखत होतं?, तो मुंबईत आला आणि त्याच्या कामाने त्याला ओळख मिळाली. मुंबई ही त्याची कर्मभूमी होती. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, हे ओरडणाऱ्यांपेक्षा आम्हाला जास्त वाटतं. ओरडून खोट्याचं खरं करता येत नसतं. सुशांतसोबत खरंच काही चुकीचं घडलं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ”, असंही राऊत म्हणाले.