मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या जाण्यानं फक्त बॉलिवूड नाही तर सारं देश शोक व्यक्त करत आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने देखील शोक व्यक्त केला आहे.
धोनीच्या कारकिर्दीवरचा चित्रपट पाहताना असे वाटत होते की सुशांत अभिनयाकडे वळला नसता तर एक चांगला क्रिकेटपटू बनला असता. धोनीच्या शैलीने फलंदाजी करताना पडद्यावर ज्या पद्धतीने सुशांत वावरला ते पाहता त्याच्याकडे क्रिकेटचे स्किल होते हेच सिद्ध झाले, अशा शब्दांत सचिनने आपले मत व्यक्त केले.