मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हाट प्रोफाईल लोकांची चौकशी करत असताना तिकडे सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे. यातच या प्रकरणात पोलिसांकडून अंकिता लोखंडेचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणी देशातील अनेक नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी माध्यमांना या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे की,’आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर ‘पेनलेस डेथ’ (वेदनेविना मृत्यू) याविषयी सर्च केलं होत.
ते पुढे म्हणाले, ‘सुशांतच्या बिल्डिंगचे 13 अणि 14 जूनचे सीसीटीव्ही फूटेज चेक केले, पण पार्टीबाबत कोणतेच पुरावे आढळले नाहीत. म्हणजेच सुशांतने आत्महत्या करण्याच्या रात्री म्हणजेच 13 जूनला कुठलीच पार्टी केली नव्हती. त्याने गुगलवर ‘पेनलेस डेथ’ (वेदनेविना मृत्यू) याविषयी सर्च केलं. बायपोलर डिसॉर्डर, स्किझोफ्रेनिया याबद्दलही सर्च केलं होतं’ असं ही ते म्हणाले.
काय आहे स्किझोफ्रेनिया ?
डॉक्टर म्हणतात,’स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार आहे तसाच मेंदूचा विकारही आहे. स्किझोफ्रेनियामध्ये काही गोष्टींमध्ये दोष निर्माण होतो. व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वत: भ्रामक व आभासी जगात जगू लागतात. त्यांचा मनावरचा ताबा सुटतो. मात्र वेळीच उपचार केल्यास यातून बाहेर पडता येते’