गुड फ्रायडे’ला रिलीज होणार “सूर्यवंशी’?

बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारच्या “सूर्यवंशी’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अक्षयकुमारसोबत या चित्रपटात कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगण आणि रणवीर सिंहही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. सूर्यवंशी चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता पण लॉकडाऊनमुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आता बातमी अशी आहे की, हा चित्रपट 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली बनविलेला सूर्यवंशी गुड फ्राइडेला रिलीज होणार आहे. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहात आहेत.

पुढील आठवड्यात चित्रपटाच्या रिलीजची तारीख घोषित केली जाईल. रोहित शेट्टी आणि चित्रपटाचे सह-निर्माते रिलायन्स एंटरटेनमेंट देखील सध्या थिएटरच्या मालकाशी बोलत आहेत. लॉकडाऊननंतर रिलीज होणारा हा बॉलीवूडचा सर्वात मोठा चित्रपट असेल. अक्षयकुमार 9 तारखेला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करू शकतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की, 9 तारीख अक्षयसाठी खूप लक्की आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.