अक्षय कुमारच्या सूर्यवंशीची घोषणा झाली तेंव्हापासूनच त्याबाबत दररोज नवीन नवीन घोषणा होत आहेत. या सिनेमात अक्षय कुमार आणि कतरिनाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. त्याशिवाय रोहित शेट्टीच्या डायरेक्शनखाली तयार झालेल्या सिंघम आणि सिंबा या पोलीसपटातील अजय देवगण आणि रणवीर सिंह हे देखील यामध्ये छोट्या रोलमध्ये दिसणार आहेत. आता 24 मार्चला सूर्यवंशी जगभर रिलीज होतो आहे. सूर्यवंशीचे लॉंचिंग एकदम हटके होणार आहे.
या दिवशी मुंबईमध्ये सर्वच थिएटरमध्ये रात्रभर सूर्यवंशी दाखवला जाणार आहे. दिवसभर तर हा सिनेमा नेहमीच्या वेळी दाखवला जाईलच. पण नाईट लाईफ सुरू झाल्यामुळे आता रात्रीही सिनेमा दाखवला जाणार आहे. याची जाहिरात करण्यासाठी अक्षय कुमारने एक व्हिडीओ रिलीज केला आहे. काही मुले 24 मार्च असे लिहीलेला कागद घेऊन रणवीर सिंहकडे येतात.
तो म्हणतो माझे ठिक आहे, सिंघम सरांना विचारा. ही मुले हाच कागद घेऊन सिंघम म्हणजे अजय देवगणकडे येतात. तो देखील होकार देतो. मग मुले सूर्यवंशी म्हणजे अक्षयकडे येतात. त्यानेही होकार दिल्यावर सगळे खूष होतात, मग 24 मार्चला दिवस आणि रात्रभर सूर्यवंशीदाखवला जाईल, असे ओरडून जाहीर करतात.