Suryakumar Yadav – भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव मागील काही काळापासून टीम इंडियासाठी एक प्रमुख खेळाडू बनला आहे. त्याने अत्यंत कमी कालावधीत टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. तो सध्या या मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये जागतिक अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. अलीकडेच, सूर्यकुमार यादवची आयसीसीने २०२२ या वर्षातील सर्वोत्कृष्ट टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. सूर्यकुमारने २०२२ या वर्षात आपल्या फलंदाजीने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.
Womens IPL Team Auction | अदानींनी मोठी रक्कम खर्च करत खरेदी केली टीम; ‘या’ पाच संघांची नावे जाहीर!
२०२२ या एका कॅलेंडर वर्षात १००० पेक्षा अधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव हा दुसरा फलंदाज ठरला. त्याने मागील वर्षभरात १८७.४३ च्या स्ट्राईक रेटने ११६४ धावा केल्या. त्यामुळे सूर्यकुमारला ‘आयसीसी पुरूष टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटमधील हा पुरस्कार जिंकणारा सूर्यकुमार हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
𝗣𝗿𝗲𝘀𝗲𝗻𝘁𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗲 𝗜𝗖𝗖 𝗠𝗲𝗻’𝘀 𝗧𝟮𝟬𝗜 𝗖𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗬𝗲𝗮𝗿 2️⃣0️⃣2️⃣2️⃣
Congratulations @surya_14kumar 👏🏻👏🏻#TeamIndia pic.twitter.com/YdgWWxvkAW
— BCCI (@BCCI) January 25, 2023
भारताचा टी-२० संघ सध्या आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारताचा एकदिवसीय संघही पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.